आरती संग्रह

Aarti Sangraha

10:30 AMMorning Aarti7:30 PMEvening Aarti

Every day of the utsav, September 14 – 18, 2026. Sung in this order.

01

सुखकर्ता दुःखहर्ता

Sukhkarta Dukhhartaश्री गणेश

The aarti that opens every session. Written by Samarth Ramdas.

जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥ सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥ हिरेजडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥२॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥ दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥३॥

The refrain is repeated after each verse.

02

शेंदूर लाल चढ़ायो

Shendur Laal Chadhayoश्री गणेश

Sung straight after Sukhkarta, in Hindi rather than Marathi.

जय जय जी गणराज विद्यासुखदाता । धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ॥

शेंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको । दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ॥ हाथ लिये गुड़ लड्डू साई सुरवरको । महिमा कहे न जाय लागत हूँ पदको ॥१॥

अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरी । विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी ॥ कोटीसूरजप्रकाश ऐसी छबि तेरी । गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारी ॥२॥

भावभगतसे कोई शरणागत आवे । संतत संपत सबही भरपूर पावे ॥ ऐसे तुम महाराज मोको अति भावे । गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥३॥

The refrain is repeated after each verse.

03

लवथवती विक्राळा

Lavthavti Vikralaश्री शंकर

जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । वीषें कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ॥ लावण्यसुंदर मस्तकी बाळा । तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझुळां ॥१॥

कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ॥ विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥२॥

देवीं दैत्यीं सागरमंथन पै केलें । त्यामाजी अवचित हळाहळ जें उठिलें ॥ तें त्वां असुरपणें प्राशन केलें । नीलकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥३॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥ शतकोटीचें बीज वाचे उच्चारी । रघुकुलटिळक रामदासा अंतरी ॥४॥

The refrain is repeated after each verse.

04

दुर्गे दुर्घट भारी

Durge Durghat Bhariश्री दुर्गा देवी

जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥

दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥ वारी वारीं जन्ममरणांतें वारी । हारी पडलो आतां संकट निवारी ॥१॥

त्रिभुवनभुवनी पाहतां तुजऐसी नाही । चारी श्रमले परंतु न बोलवे कांही ॥ साही विवाद करितां पडिले प्रवाही । तें तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥२॥

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां । क्लेशांपासुनि सोडी तोडी भवपाशा ॥ अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा । नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥३॥

The refrain is repeated after each verse.

05

युगे अठ्ठावीस

Yuge Atthavisश्री विठ्ठल

जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥ पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥

तुळसीमाळा गळां कर ठेवुनी कटीं । कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥ देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढे उभे राहती ॥२॥

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळे वनमाळा गळां ॥ राही रखुमाबाई राणीया सकळा । ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती । चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ॥ दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नाने जे करिती ॥ दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती । केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥५॥

The refrain is repeated after each verse.

06

घालीन लोटांगण

Ghalin Lotanganसमारोप

The closing prayer, sung standing with folded hands.

घालीन लोटांगण, वंदीन चरण । डोळ्यांनी पाहीन रूप तुझें ॥ प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन । भावें ओवाळीन म्हणे नामा ॥१॥

त्वमेव माता च पिता त्वमेव । त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ॥ त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ॥ करोमि यद्यत्सकलं परस्मै । नारायणायेति समर्पयामि ॥३॥

अच्युतं केशवं रामनारायणं । कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं ॥ श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं । जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥४॥

07

मंत्रपुष्पांजली

Mantrapushpanjaliसमर्पण

The final offering of flowers, sung with everyone standing.

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॥

ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ॥ स मे कामान् काम कामाय मह्यम् । कामेश्वरो वैश्रवणो ददातु ॥ कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॥

ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति ॥

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

गणपती बाप्पा मोरया

Ganpati Bappa Morya